Saturday, May 10, 2014

Lovely Marathi Song, from Sanai Chaughade, Kande Pohe

भिजलेल्या  क्षणांना  आठवणीची  फोडणी,
हळदीसाठी   आसूसलेले  हळवे मन  आणि  कांती
आयुष्य  हे  चुलीवरल्या, कढईतले,  कांदेपोहे

नात्यांच्या  ह्या  बाजारातून  विक्रेत्यांची  दाटी,
आणि  म्हणे  तो  वरचा  ठरवी   शतजन्माच्या गाठी,
रोज  नटवे  रोज सजावे  धरून  आशा  खोटी,
पाने  मिटुनी  लाजळूपरी  पुन्हा  उघडण्यासाठी,
आयुष्य  हे  चुलीवरल्या , कढईतले , कांदेपोहे

दूरदेशीच्या  राजकुमाराची  स्वप्ने  पाहतांना,
कुणीतरी  यावे  हळूच  मागून  ध्यानीमनी  नसतांना,
नकळत  आपण  हरवून  जावे  स्वतःस  मग  जपतांना
अन मग  डोळे उघडावे हे दिवा  स्वप्न पाहतांना 
आयुष्य  हे  चुलीवरल्या , कढईतले , कांदेपोहे

भूतकाळच्या  धूऊन   अक्षदा  तांदूळ  केले  ज्यांनी ,
आणि  सजवला  खोटा रुखवत  भाड्याच्या भांड्यांनी ,
भविष्य  आता  रंगवण्याचा  अत्तहासहि  यांचास
हातावरल्या   मेहेदीवर ओतून  लिंबाचे   पाणी
आयुष्य  हे  चुलीवरल्या ,कढईतले ले, कांदेपोहे

No comments:

Post a Comment