दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही
क्षण एक ही ना ज्याला, तुझी आठवण नाही
भेट तुझी ती पहिली, लाख लाख आठवतो
रुप तुझे ते धुक्याचे, कण कण साठवतो
वेड सखी साजणी हे, मज वेडावून जाई
असा भरुन ये ऊर, जसा वळीव भरावा
अशी हूरहूर जसा गंध रानी पसरावा
रान मनातले माझ्या, मग भिजूनीया जाई
आता अबोध मनाची, अनाकलनीय भाषा
कशा गूढ गूढ माझ्या तळहातावर रेषा
असे आभाळ आभाळ दूर पसरुन राही
Friday, May 23, 2014
Dis Nakalat Jaai marathi song SINGERS: Milind M. Ingle
Dhag datuni Yetat - Film : Aie Shappath
ढग दाटूनी येतात, मन वाहूनी नेतात
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी जातात
झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची
सर येते, माझ्यात..
माती लेऊनीया गंध, होत जाते धुंद धुंद
तिच्या अंतरात खोल अंकुरतो एक बंध
मुळे हरखूनी जातात, झाडे पाऊस होतात
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात
झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची
सर येते, माझ्यात..
सुंबरान गाऊ या रं सुंबरान गाऊ या
झिलरी झिलरी आम्ही तुम्ही सुंबरान गाऊ या
सुंबरान गाऊ या रं सुंबरान गाऊ या
जीव होतो ओला चिंब, घेतो पाखराचे पंख
सार्या आभाळाला देतो एक ओलसर रंग
शब्द भिजूनी जातात अर्थ थेंबांना येतात
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात
झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची
सर येते, माझ्यात..
Swarg Ha Nava- marathi song Tujhya Majhya Sansarala Aani Kaai Hava -Song Ajay, Atul
स्वर्ग हा नवा वाटतो हवा
साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा
ऐक साजणी ह्या खुळ्या क्षणी
वेड लावतो जीवा तुझाच गोडवा
चिमणे घरटे सजले साजरे, इवले सुख हे फुलले आज रे
भरले घर हे आनंदाने, मन हे गाते गीत तुझे ऐक ना
प्रेम गीत छेडीतो उरात पारवा
बघुनी अपुले घर स्वप्नातले
सजणी झुलले तनमन नाचले
जुळली नाती दोन जीवांचे
जीव हे झाले एकरूप साजणा
Kase Sartil Saye Mazya Vina Dis Tuze,Marathi Song , Sandeep Khare
कसे सरतील सये, माझ्यावीना दिस तुझे सरताना आणि सांग सलतील ना ? गुलाबाचे फुलं दोन, रोज राती डोळ्यांवर मुसुमुसु पाणी सांग भरतील ना ? पावसाच्या धारा धारा, मोजताना दिस सारा रितेरिते मन तुझे उरे, ओठभर हसे हसे उरातून वेडेपिसे, खोल खोल कोण आंत झुरे आता जरा अळीमिळी, तुझी माझी व्यथा निळी सोसताना सुखावून हसशील ना ? कोण तुझ्या सौधातून्, उभे असे सामसूम चिडीचूप सुनसान दिवा, आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच, नभातून गोरा चांदवा चांदण्यांचे कोटी कण, आठवांचे ओले सण रोज रोज नीजभर भरतील ना ? इथे दूर देशी, माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी झडे सर कांचभर तडा, तुच तुच तुझ्या तुझ्या तुझी तुझी तुझे तुझे, सारा सारा तुझा तुझा सडा पडे माझ्या वाटेतून, आणि मग काट्यातून जातांनाही पायभर मखमल ना ? आता नाही बोलायाचे, जरा जरा जगायाचे माळूनीया अबोलीची फुले, देहभर हलू देत वीजेवर डुलू देत, तुझ्या माझ्या विरहाचे झुले जरा घन झुरू दे ना, वारा गुदमरू दे ना तेंव्हा नभ धरा सारी भिजवेल ना ?
Najuk Japale: serial Tujha Majha Jamena Full marathi Song
नाजूक जपले गंध फुलांचे आज उधळले सारे
श्वासांना या आग लागली बर्फ वितळले सारे
मी शब्दांच्या काठांवरती शोधत असता काही
हलके हलके मौनामध्ये अर्थ मिसळले सारे
पदर धुक्याचा शिखरावरुनी हलके घसरत गेला
नेत्रांमधुनी गात्रांमधुनी ऊन उजळले सारे
Zindagi Zindagi marathi Song Duniyadari full song 2013 best song ever
जिंदगी जिंदगी जिंदगी हा जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हसीन मेरी जिंदगी ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे थॉटचा हा शॉट नको रे थोडा कश मार ले सावकाश मार रे हलकी हलकी किक बसू दे सारे गम छोड दे, एक दम ओढ ले स्मोक में ही होप है प्यारे मै जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुंवे में उडाता चला गया
साला ही गॅंगच वेगळी, कट्टा गॅंग सगळ्यांची आपली ओळख झाली हा अशक्या हा कुणाचाच नव्हता तरीही गॅंगचा हे उम्या आणि श्री हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्या सारखे कुठेही गेले तरी एकत्र आता राहिले सॉरी आणि नित्या यांची दिघ्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली
Sorry Sorry म्हणत म्हणत, या जगी हा आला रे बात में है Confusion, गडबड घोटाला रे दस का बीस करने में, शातीर ये साला रे झोल झोल करुनी, तरी ठण ठण गोपाळा रे अरे यारी में Sorry आये तो गलत है पर अपने Sorry की तो बात अलग है ये झोलर, कमीना सोचता कभी ना यारी में ही झोल छुपा है झोल में ही यारी छुपी है मै जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुंवे में उडाता चला गया
दिघ्या बरोबर मी पहिली सिगरेट प्यायलो दिघ्या आपला पहिला Friend आणि त्याच बरोबर मला कळलेल दिघ्याचे पहिले प्रेम च्याआईला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र …
जेव्हा पाहिलं हिला, ये दिल हिल्ला हिल्ला सारा जिल्हा हिल्ला, हुआ रे जलजला घराच्या सामोरी नजरेची शाळा ही, रोज रोज भरवायची हाय लैला नि मजनूची सॅडवाली Love Story आपल्याला बदलायची हाय ही सुरेखा , आपल्याला पटलेली हाय अरे खिडकीमधून कशी लाजून हसलेली हाय अरे हसली हसली दिघ्या फूल टू फसलेली हाय हसलेली हाय, फसलेली हाय, या दिघ्याला पटलेली हाय
कधी ह्यांचे होऊन गेले कळलेच नाही एक वेगळीच दुनिया एक वेगळीच दुनियादारी ...
मै जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुंवे में उडाता चला गया दोस्तों की दुनियादारी में हसीन मेरी जिंदगी जिंदगी जिंदगी जिंदगी हा जिंदगी
Nahi kalale kadhi jiv vedavala marathi song Serial "Honar Sunn Mi Hya Gharchi" on Zee Marathi.
तू मला, मी तुला, गुणगुणू लागलो
पांघरू लागलो, सावरू लागलो
नाही कळले कधी....२
नाही कळले कधी जीव वेडावला
ओळखू लागलो तू मला मी तुला
गोड हुरहूर ही श्वास गंधावला
ओळखू लागलो, तू मला मी तुला
तू मला, मी तुला, गुणगुणू लागलो
पांघरू लागलो, सावरू लागलो
तू कळी कोवळी, साजिरी गोजिरी
चिंब ओल्या सरी घेत अंगावरी
स्वप्न भासे खरे, स्पर्श होता खुळा
ओळखू लागलो, तू मला मी तुला
शब्द झाले मुके बोलती पैंजणे
उतरले गाली या सोवळे चांदणे
पाहताना तुला चंद्र ही लाजला
ओळखू लागलो तू मला मी तुला
Jai Sharde Vaageshwari Lyricist : Shanta Shelke, Singer : Asha Bhosle, Music Director : Shridhar Phadke,
जय शारदे वागीश्वरी
विधिकन्यके विद्याधरी
ज्योत्स्नेपरि कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा
उजळे तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा
तुझिया कृपेचे चांदणे नित वर्षू दे अमुच्या शिरी
वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलावय अंगुली
संगीत जन्मा ये नवे, जडता मतीची भंगली
उन्मेष कल्पतरुवरी, बहरून आल्या मंजिरी
May Bhavani tujhe lekaru, marathi song movie "Shabbas sunbai"
मायभवानी, तुझे लेकरू कुशीत तुझिया येई
सेवा मानून घे आई
तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया
तुझ्या दयेचा ओघ अखंडीत, दुरित लयाला नेई
तू अमला अविनाशी किर्ती, तू अवघ्या आशांची पूर्ती
जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वा ते नेई
तूच दिलेली मंजुळ वाणी, डोळ्यांमधले निर्मळ पाणी
तुझ्या पूजना माझ्या पदरी याविण दुसरे नाही
Daatale Reshami Marathi Song |Time Pass (TP)| Marathi Movie
मौला इश्क़ हैं खुदा, दुहाई देती हैं जुबां
दाटले रेशमी आहे धुके धुके, दाटले हे धुके
बोलती स्पर्श हे बाकी मुके मुके, दाटले हे धुके
दिवे लाखो मनामध्ये लागले लागले
दाटले रेशमी आहे धुके धुके, दाटले हे धुके
मौला इश्क़ हैं खुदा, दुहाई देती हैं जुबां
रंग हे सारे तुझे फुल मी कोवळे
कोणती जादू भोळी झाली रे ना कळे
बेफिकीर मन हे झाले, भान प्रेमाचे आले
बावरे स्पर्श सारे नवे नवे
Won't you stay with me...Won't you be with me
No matter where I go..You are the one
Oh I Love you..baby I love you..
झेलते हलके हलके पावसाच्या सरी
आठवून का तुला रे झाले मी बावरी
बेफिकीर मन हे झाले, भान प्रेमाचे आले
सोपे होईल सारे तुझ्यासवे
दाटले रेशमी आहे धुके धुके, दाटले हे धुके
बोलती स्पर्श हे बाकी मुके मुके, दाटले हे धुके
मौला इश्क़ हैं खुदा, दुहाई देती हैं जुबां
Thursday, May 22, 2014
Chala Jejurila Jau - navara mazha navsach-Marathi Song
लई दिसाची हौस राया
चला आता पुरी करू - २
चला जेजुरीला जाऊ - ६
एक आना अबलक घोडा - २
त्याची रेशीम खाली सोडा - २
माग बसा मी पुढ्यात बसते - २
जगाला कौतुक दावू
चला जेजुरीला जाऊ - ६
जेजुरी गडावर जाऊ - २
देव माल्हारीला पाहू - २
आपण दोघ जोडीजोडीने -
बेल भंडारा वाहू
चला जेजुरीला जाऊ - ६
चला आता पुरी करू - २
चला जेजुरीला जाऊ - ६
एक आना अबलक घोडा - २
त्याची रेशीम खाली सोडा - २
माग बसा मी पुढ्यात बसते - २
जगाला कौतुक दावू
चला जेजुरीला जाऊ - ६
जेजुरी गडावर जाऊ - २
देव माल्हारीला पाहू - २
आपण दोघ जोडीजोडीने -
बेल भंडारा वाहू
चला जेजुरीला जाऊ - ६
Sanj veli sanj rangi | Official Full Video Song | Kshanbhar Vishranti
(सांज वेळी सांज रंगी
रंगले मन हे
पावलांना साद देती या दिशा )- २
स न न सन सूर हे नवे
फुलून मन गाये त्या सवे
ओठावरी .. सरगम …
भिर भिर या अंबरी
नभाच्या ऊरी
वाटते ऊंच ऊंच विहारावे
रंग निळे जांभळे
ऊन कोवळे
घेऊनी पंखांवर मिरवावे
वाऱ्यातले सूर फुलवीत यावी ओठावरी
यावी ओठावरी – २ सरगम …
(गहिवर या क्षणी वाटते मनी
रेशमी स्वप्न नवे उमलावे …
नकळत यावे कुणी
हरपुनी भान असे बरसावे ) -२
मनातले अर्थ फुलवित यावे ओठावरी
यावी ओठावरी – २ सरगम …
(सांज वेळी सांज रंगी
रंगले मन हे
पावलांना साद देती या दिशा )- २
स न न सन सूर हे नवे
फुलून मन गाये त्या सवे
ओठावरी .. सरगम …
Shabda Vina | Marathi Movie Tu Tithe Mee | Mohan Joshi | Marathi Song
शब्दाविना ओठांतले कळले मला, कळले तुला
शब्दाविना कळले मला
ओठांतले कळले मला
डोळ्यांतुनी हृदयातले कळले मला, कळले तुला
डोळ्यांतुनी कळले मला
हृदयातले कळले मला
जुळले कधी धागे कसे जडले तुझे मजला पिसे
रात्रंदिनी ध्यानी-मनी मूर्ति तुझी हसरी दिसे
घडली कशी जादू अशी स्वप्नातला झुलता झुला
झुलतो झुला स्वप्नातला
स्वप्नातला झुलतो झुला
तू छेडियल्या तारांतुनी जन्मांस या स्वर लाभले
माझ्या-तुझ्या प्रीतीतुनी गाणे नवे झंकारले
दाही दिशा भरुनी उरे आनंद या जगण्यातला
आनंद या जगण्यातला
कळले मला, कळले तुला
शब्दाविना कळले मला
ओठांतले कळले मला
डोळ्यांतुनी हृदयातले कळले मला, कळले तुला
डोळ्यांतुनी कळले मला
हृदयातले कळले मला
जुळले कधी धागे कसे जडले तुझे मजला पिसे
रात्रंदिनी ध्यानी-मनी मूर्ति तुझी हसरी दिसे
घडली कशी जादू अशी स्वप्नातला झुलता झुला
झुलतो झुला स्वप्नातला
स्वप्नातला झुलतो झुला
तू छेडियल्या तारांतुनी जन्मांस या स्वर लाभले
माझ्या-तुझ्या प्रीतीतुनी गाणे नवे झंकारले
दाही दिशा भरुनी उरे आनंद या जगण्यातला
आनंद या जगण्यातला
कळले मला, कळले तुला
Nishana tula disla na - Navri mile Navryala
(निशाणा तुला दिसला ना - २
झिरमिर झिरमिर पाऊस धारा
भिर भिर करी मदनाचा वारा
ये ना सजन ये ना
निशाणा तुला दिसला ना - २ ) - २
(हरिणी आली दारी धुंद होऊनी
होणा तूच शिकारी डाव टाकुनी ) - २
नेम असा तू धरुनी येना
सावध तू वेचून घेणा
ये ना सजना ये ना
निशाणा तुला दिसला ना - २
(सावध होई शिकारी जादू पाहुनी
घायालांची प्रीती आली रंगुनी ) - २
नयनांचे शर मारू नको ना
प्रीत फुल तू जवळी ये ना
ये ना साजणी ये ना
निशाणा मला जमला ना - २
झिरमिर झिरमिर पाऊस धारा
भिर भिर करी मदनाचा वारा
ये ना साजणी ये ना
(निशाणा मला जमला ना
निशाणा तुला दिसला ना ) - २
झिरमिर झिरमिर पाऊस धारा
भिर भिर करी मदनाचा वारा
ये ना सजन ये ना
निशाणा तुला दिसला ना - २ ) - २
(हरिणी आली दारी धुंद होऊनी
होणा तूच शिकारी डाव टाकुनी ) - २
नेम असा तू धरुनी येना
सावध तू वेचून घेणा
ये ना सजना ये ना
निशाणा तुला दिसला ना - २
(सावध होई शिकारी जादू पाहुनी
घायालांची प्रीती आली रंगुनी ) - २
नयनांचे शर मारू नको ना
प्रीत फुल तू जवळी ये ना
ये ना साजणी ये ना
निशाणा मला जमला ना - २
झिरमिर झिरमिर पाऊस धारा
भिर भिर करी मदनाचा वारा
ये ना साजणी ये ना
(निशाणा मला जमला ना
निशाणा तुला दिसला ना ) - २
Wednesday, May 21, 2014
MAN RANAT GEL. lovely song picturised on Little naughty Mukta Barve sung by Shreya Ghoshal
मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
मन चिंचेच्या झाडात, अंब्याच्या पाडात गेलं ग
बिल्लोरी खिल्लोरी सांज सांज पाहु ग
झिम्माड वारा होऊ ग
लबाड या तार्याला थांब थांब सांगु ग
चांदाला हात लावु ग
भिरभिरल्यावानी ही धरती फुलारं
कळीला जाग आली ग
थरथरल्यावानी हे नाचं शिवार
कळीचं फूल झालं ग
भानात, रानात हे धुंदधुंद झालं मन... रानात गेलं ग !
सर्राट ह्या आभाळी उंच उंच जाऊ ग
वार्याचं पंख होऊ ग
थर्राट पाण्यामंदी चिंब चिंब न्हाऊ ग
ढगाचा झोका होऊ ग
शिरशिरल्यावाणी ही झाडं चुकार
पानाची साद देती ग
सरसरल्यावानी ही माती हुंकारं
रंगांचा नाद होई ग
भानात, रानात हे धुंदधुंद झालं मन... रानात गेलं ग !
मन चिंचेच्या झाडात, अंब्याच्या पाडात गेलं ग
बिल्लोरी खिल्लोरी सांज सांज पाहु ग
झिम्माड वारा होऊ ग
लबाड या तार्याला थांब थांब सांगु ग
चांदाला हात लावु ग
भिरभिरल्यावानी ही धरती फुलारं
कळीला जाग आली ग
थरथरल्यावानी हे नाचं शिवार
कळीचं फूल झालं ग
भानात, रानात हे धुंदधुंद झालं मन... रानात गेलं ग !
सर्राट ह्या आभाळी उंच उंच जाऊ ग
वार्याचं पंख होऊ ग
थर्राट पाण्यामंदी चिंब चिंब न्हाऊ ग
ढगाचा झोका होऊ ग
शिरशिरल्यावाणी ही झाडं चुकार
पानाची साद देती ग
सरसरल्यावानी ही माती हुंकारं
रंगांचा नाद होई ग
भानात, रानात हे धुंदधुंद झालं मन... रानात गेलं ग !
Kunjawanatil Sunder Rani Movie : Agga Bai Arrecha Music Composed by : Ajay Atul
कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी
चांदणं राती अशा एकांती मनसागर उसळं मीलनाची ऊर्मी
लखलख चंदेरी आभाळ होते माझ्या मनीही प्रीत जागते
प्रियतम भेटाया तुज आले मी .... कळलं का ?
कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी
चांदणं राती अशा एकांती मनसागर उसळं मीलनाची ऊर्मी
मेघसावळा माझा राया, भोळा भाबडा माझा राया
माझ्यावरी त्याची आभाळाएवढी माया ... माझा राया ग
मर्दानी छातीचा माझा राया, मोठ्या मनाचा माझा राया
माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया ... माझा राया ग
माझं काळीज तू, माझी हरणी, तुझं रूप हे नक्षत्रावानी
ह्या संसाराला देवाजीची छाया ग
मेघसावळा माझा राया भोळा भाबडा माझा राया
माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया ... माझा राया ग
मन माझे उमलून गेले स्पर्श तुझा झाला
प्रीतिचा बहर बघ आला, हा वेड लावुनी गेला
होतो मी एक अनामिक व्यर्थ भटकलेला
तू आलीस अन् जगण्याला अर्थ नवा आला
प्रीतिचा बहर बघ आला, हा वेड लावुनी गेला
मक्याच्या शेतात एकलीच होते ठाऊक नव्हतं कुणा
अरे उभ्या पिकामंदी अडवा घुसतोय हाय कोन ह्यो पाहुणा
मी दाबून बघतुया कणसं भरला हाय का दाणा
तुझ्या प्रीतित झाले खुळी, तुझ्यावाचून न करमे मुळी
माझ्या श्वासांत तू, माझ्या स्वप्नात तू, तरी का रे सख्या दूर तू
सजणा याद ही याद ही छळते तुझी याद रे
तुझ्या प्रीतित झालो खुळा, छंद नाही मला वेगळा
माझ्या श्वासात तू, माझ्या स्वप्नात तू, तरी का ग सखे दूर तू
सजणी याद ही याद ही छळते तुझी याद ग
चांदणं राती अशा एकांती मनसागर उसळं मीलनाची ऊर्मी
लखलख चंदेरी आभाळ होते माझ्या मनीही प्रीत जागते
प्रियतम भेटाया तुज आले मी .... कळलं का ?
कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी
चांदणं राती अशा एकांती मनसागर उसळं मीलनाची ऊर्मी
मेघसावळा माझा राया, भोळा भाबडा माझा राया
माझ्यावरी त्याची आभाळाएवढी माया ... माझा राया ग
मर्दानी छातीचा माझा राया, मोठ्या मनाचा माझा राया
माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया ... माझा राया ग
माझं काळीज तू, माझी हरणी, तुझं रूप हे नक्षत्रावानी
ह्या संसाराला देवाजीची छाया ग
मेघसावळा माझा राया भोळा भाबडा माझा राया
माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया ... माझा राया ग
मन माझे उमलून गेले स्पर्श तुझा झाला
प्रीतिचा बहर बघ आला, हा वेड लावुनी गेला
होतो मी एक अनामिक व्यर्थ भटकलेला
तू आलीस अन् जगण्याला अर्थ नवा आला
प्रीतिचा बहर बघ आला, हा वेड लावुनी गेला
मक्याच्या शेतात एकलीच होते ठाऊक नव्हतं कुणा
अरे उभ्या पिकामंदी अडवा घुसतोय हाय कोन ह्यो पाहुणा
मी दाबून बघतुया कणसं भरला हाय का दाणा
तुझ्या प्रीतित झाले खुळी, तुझ्यावाचून न करमे मुळी
माझ्या श्वासांत तू, माझ्या स्वप्नात तू, तरी का रे सख्या दूर तू
सजणा याद ही याद ही छळते तुझी याद रे
तुझ्या प्रीतित झालो खुळा, छंद नाही मला वेगळा
माझ्या श्वासात तू, माझ्या स्वप्नात तू, तरी का ग सखे दूर तू
सजणी याद ही याद ही छळते तुझी याद ग
Ude Ga Ambe,Marathi Song, Movie : Agga Bai Arrecha Music Composed by : Ajay Atul
उधे ग अंबे उधे !
उधे ग अंबे उधे !
होऊ दे सर्व दिशी मंगळ
चढवितो रात्रंदिन संबळ
फुलवितो दिवटी दीपकळी
आम्ही अंबेचे गोंधळी !
उधे ग अंबे उधे !
उधे ग अंबे उधे !
घरोघरी हिंडतो न् गोंधळ आईचा मांडतो
आईचा मांडतो न् गोंधळ देवीचा मांडतो
भवानी बसली ओठी गळी
आम्ही अंबेचे गोंधळी !
सान थोर नेणतो न् आम्ही दैवाशी जाणतो
दैवाशी जाणतो न् आम्ही दैवाशी जाणतो
घावली मूळमायेची मुळी
आम्ही अंबेचे गोंधळी
बोला अंबाबाईचा .... उधो !
रेणुकादेवीचा .... उधो !
एकवीरा आईचा .... उधो !
या आदिमायेचा .... उधो !
जगदंबेचा .... उधो !
महालक्ष्मीचा .... उधो !
सप्तशृंगीचा .... उधो !
काळुबाईचा .... उधो !
तुळजाभवानी आईचा .... उधो !
उधे ग अंबे उधे !
होऊ दे सर्व दिशी मंगळ
चढवितो रात्रंदिन संबळ
फुलवितो दिवटी दीपकळी
आम्ही अंबेचे गोंधळी !
उधे ग अंबे उधे !
उधे ग अंबे उधे !
घरोघरी हिंडतो न् गोंधळ आईचा मांडतो
आईचा मांडतो न् गोंधळ देवीचा मांडतो
भवानी बसली ओठी गळी
आम्ही अंबेचे गोंधळी !
सान थोर नेणतो न् आम्ही दैवाशी जाणतो
दैवाशी जाणतो न् आम्ही दैवाशी जाणतो
घावली मूळमायेची मुळी
आम्ही अंबेचे गोंधळी
बोला अंबाबाईचा .... उधो !
रेणुकादेवीचा .... उधो !
एकवीरा आईचा .... उधो !
या आदिमायेचा .... उधो !
जगदंबेचा .... उधो !
महालक्ष्मीचा .... उधो !
सप्तशृंगीचा .... उधो !
काळुबाईचा .... उधो !
तुळजाभवानी आईचा .... उधो !
Morya Morya - Superhit Ganpati Song - Ajay-Atul - Uladhaal Marathi Movie
हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया
तुझ्या इना माणसाचा जन्म जाई वाया
हे देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी समिंदराची माया
मोरया.. मोरया.. मोरया.. मोरया..
ॐकाराचं रूप तुझं चराचरामंदी
झाड-येली-पानासंगं फूल तू सुगंधी
भगताचा पाठिराखा गरिबाचा वाली
माझी भक्ती - तुझी शक्ती एकरूप झाली
देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी समिंदराची माया
मोरया.. मोरया.. मोरया.. मोरया..
आदि-अंत तूच खरा, तूच बुद्धी दाता
शरण मी आलो तुला पायावर माथा
डंका वाजं दहा दिशी, गजर नावाचा
संकटाला बळ देई अवतार देवाचा
देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी समिंदराची माया
मोरया.. मोरया.. मोरया.. मोरया..
गणपति बाप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया
मोरया.. मोरया.. मोरया.. मोरया..
तुझ्या इना माणसाचा जन्म जाई वाया
हे देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी समिंदराची माया
मोरया.. मोरया.. मोरया.. मोरया..
ॐकाराचं रूप तुझं चराचरामंदी
झाड-येली-पानासंगं फूल तू सुगंधी
भगताचा पाठिराखा गरिबाचा वाली
माझी भक्ती - तुझी शक्ती एकरूप झाली
देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी समिंदराची माया
मोरया.. मोरया.. मोरया.. मोरया..
आदि-अंत तूच खरा, तूच बुद्धी दाता
शरण मी आलो तुला पायावर माथा
डंका वाजं दहा दिशी, गजर नावाचा
संकटाला बळ देई अवतार देवाचा
देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी समिंदराची माया
मोरया.. मोरया.. मोरया.. मोरया..
गणपति बाप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया
मोरया.. मोरया.. मोरया.. मोरया..
Lakh Lakh Chanderi - Ajay - Atul Live
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या
तो काळ विसाव्या शतका आरंभीचा
या जगी चित्रपट बनू लागले होते
वारसा आम्हां जरी होता अष्टकलांचा
हे तंत्र आमुच्या देशी आले नव्हते
पण करुनी ठाम निर्धार योगी वृत्तीने
फाळके ऋषिंनी खडतर व्रत आचरले
अर्जुनास जैसे लक्ष्य एकची डोळा
जे अशक्य होते शक्य तयांनी केले
मग कथा घेऊनी हरिश्चंद्र राजाची
या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले
शनिवार तीन मे एकोणिसशे तेरा
भारतभूमीवर चलतचित्र अवतरले
नव तेजाने मने उजळली, घडली ऐसी किमया
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या
प्रभात आली प्रभात झाली जगती गाजावाजा
बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा
चित्र म्हणा वा फिल्म, सिनेमा, पिक्चर, मुव्ही काही म्हणा
आनंदाचा झोत असे हा, संस्कृतीच्या पाऊल खूणा
घटकाभरची करमणूक वा दोन घडीचा विरंगुळा
बघताबघता व्यापुनी जातो देहभान अमुचे सगळा
रडणार्याचे अश्रू पुसतो लकेर देतो हास्याची
पराभूताला चाहूल देतो भविष्यातल्या भाग्याची
आयुष्याच्या क्षणाक्षणांशी बांधतसे रेशिम नाते
आठवणींना असा बिलगतो कंठाशी दाटून येते
जिवाशीवाशी नाळ जोडती लावूनी जाती माया
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या
आता न आम्हा कुणी थांबवा आम्ही घेतला श्वास नवा
पाठीवरती थाप हवी मज धीर हवा आधार हवा
सात समुद्रापार मराठी चित्रध्वजा आम्ही नेऊ
उच्च प्रतीच्या कलागुणांचे नजराणे आम्ही देऊ
रसीक जनांचे जीवन सारे आनंदाने पूर्ण भरू
भव्य दिव्य दृक्श्राव्य कलेचे सर्वार्थाने चीज करू
नव्या चित्रसृष्टीचे ऐका पडघम अन् चौघडे
मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे........२
झळाळती कोटी ज्योती या
तो काळ विसाव्या शतका आरंभीचा
या जगी चित्रपट बनू लागले होते
वारसा आम्हां जरी होता अष्टकलांचा
हे तंत्र आमुच्या देशी आले नव्हते
पण करुनी ठाम निर्धार योगी वृत्तीने
फाळके ऋषिंनी खडतर व्रत आचरले
अर्जुनास जैसे लक्ष्य एकची डोळा
जे अशक्य होते शक्य तयांनी केले
मग कथा घेऊनी हरिश्चंद्र राजाची
या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले
शनिवार तीन मे एकोणिसशे तेरा
भारतभूमीवर चलतचित्र अवतरले
नव तेजाने मने उजळली, घडली ऐसी किमया
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या
प्रभात आली प्रभात झाली जगती गाजावाजा
बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा
चित्र म्हणा वा फिल्म, सिनेमा, पिक्चर, मुव्ही काही म्हणा
आनंदाचा झोत असे हा, संस्कृतीच्या पाऊल खूणा
घटकाभरची करमणूक वा दोन घडीचा विरंगुळा
बघताबघता व्यापुनी जातो देहभान अमुचे सगळा
रडणार्याचे अश्रू पुसतो लकेर देतो हास्याची
पराभूताला चाहूल देतो भविष्यातल्या भाग्याची
आयुष्याच्या क्षणाक्षणांशी बांधतसे रेशिम नाते
आठवणींना असा बिलगतो कंठाशी दाटून येते
जिवाशीवाशी नाळ जोडती लावूनी जाती माया
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या
आता न आम्हा कुणी थांबवा आम्ही घेतला श्वास नवा
पाठीवरती थाप हवी मज धीर हवा आधार हवा
सात समुद्रापार मराठी चित्रध्वजा आम्ही नेऊ
उच्च प्रतीच्या कलागुणांचे नजराणे आम्ही देऊ
रसीक जनांचे जीवन सारे आनंदाने पूर्ण भरू
भव्य दिव्य दृक्श्राव्य कलेचे सर्वार्थाने चीज करू
नव्या चित्रसृष्टीचे ऐका पडघम अन् चौघडे
मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे........२
Dev Jari maj kadhi bhetala-Molkarin Marathi song
देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला......२
म्हणेन प्रभू रे माझे सारे जीवन देई मम बाळाला.......२
कृष्णा गोदा स्नान घालु दे, रखुमाबाई तीट लावु दे
ज्ञानेशाची गाऊन ओवी मुक्ताई निजवु दे तुजला
शिवरायाच्या मागीन शौर्या, कर्णाच्या घेईन औदार्या
ध्रुव-चिलयाच्या अभंग प्रेमा लाभु दे चिमण्या राजाला
देव जरी मज कधी भेटला,
Dis Jatil Dis Yetil !!! Marathi song
तुझ्यामाझ्या या संसाराला आनि काय हवं
तुझ्यामाझ्या या लेकराला घरकुल नवं
नव्या घरामंदी काय नवीन घडलं
घरकुलासंगं सम्दं येगळं होईल
दिसं जातील, दिसं येतील
भोग सरंल, सुख येईल
अवकळा सम्दी जाईल निघुनी
तरारेल बीज तुजं माझ्या कुशीतुनी
मिळंल का त्याला ऊन वारा पानी ?
राहील का सुकंल ते तुझ्यामाझ्यावानी ?
रोप अपुलंच पर होईल येगळं
दैवासंग झुंजायाचं देऊ त्याला बळ
ढगावानी बरसंल त्यो, वार्यावानी हसवंल त्यो
फुलावानी सुखवील, काट्यांलाबी खेळवील
समद्या दुनियेचं मन रिझवील त्यो
असंल त्यो कुनावानी, कसा ग दिसंल
तुझ्यामाझ्या जीवाचा त्यो आरसा असंल
उडुनिया जाईल ही आसवांची रात
अपुल्याचसाठी उद्या फुटंल पहाट
पहाटच्या दंवावानी तान्हं तुजंमाजं
सोसंल ग कसं त्याला जीवापाड ओझं
इवल्याशा पणतीचा इवलासा जीव
त्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव
दिसं जातील, दिसं येतील.......२
भोग सरंल, सुख येईल ........२
तुझ्यामाझ्या या लेकराला घरकुल नवं
नव्या घरामंदी काय नवीन घडलं
घरकुलासंगं सम्दं येगळं होईल
दिसं जातील, दिसं येतील
भोग सरंल, सुख येईल
अवकळा सम्दी जाईल निघुनी
तरारेल बीज तुजं माझ्या कुशीतुनी
मिळंल का त्याला ऊन वारा पानी ?
राहील का सुकंल ते तुझ्यामाझ्यावानी ?
रोप अपुलंच पर होईल येगळं
दैवासंग झुंजायाचं देऊ त्याला बळ
ढगावानी बरसंल त्यो, वार्यावानी हसवंल त्यो
फुलावानी सुखवील, काट्यांलाबी खेळवील
समद्या दुनियेचं मन रिझवील त्यो
असंल त्यो कुनावानी, कसा ग दिसंल
तुझ्यामाझ्या जीवाचा त्यो आरसा असंल
उडुनिया जाईल ही आसवांची रात
अपुल्याचसाठी उद्या फुटंल पहाट
पहाटच्या दंवावानी तान्हं तुजंमाजं
सोसंल ग कसं त्याला जीवापाड ओझं
इवल्याशा पणतीचा इवलासा जीव
त्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव
दिसं जातील, दिसं येतील.......२
भोग सरंल, सुख येईल ........२
Pari Mhanu Ki Sundara - Avdhoot Gupte's Superhit Song - Golmaal - Amruta Khanvilkar, Jitendra Joshi
परी म्हणू की सुंदरा तिची तर्हा असे जरा निराळी......२
तिची अदा करी फिदा ही मेनका कुणी जणु निघाली.......२
तिचे वळून पाहणे, मधाळ गोड बोलणे......२
कधी खट्याळ हासुनी हळूच जीभ चावणे.......२
मोकळा करुन मीच हे कधीच दिल तिच्या हवाली
तिची अदा करी फिदा ही मेनका कुणी जणु निघाली.......२
तिचे वळून पाहणे, मधाळ गोड बोलणे......२
कधी खट्याळ हासुनी हळूच जीभ चावणे.......२
मोकळा करुन मीच हे कधीच दिल तिच्या हवाली
तिची अदा करी फिदा ही मेनका कुणी जणु निघाली
परी म्हणू की सुंदरा तिची तर्हा असे जरा निराळी
परी म्हणू की सुंदरा तिची तर्हा असे जरा निराळी
तिची अदा करी फिदा ही मेनका कुणी जणु निघाली
हजारदा ती भेटते, बोलुबोलु वाटते......२
बोलणे मनातले परि मनीच राहते ......२
मोहिनी तिची अशी फुले जशी हजार भोवताली
बोलणे मनातले परि मनीच राहते ......२
मोहिनी तिची अशी फुले जशी हजार भोवताली
परी म्हणू की सुंदरा तिची तर्हा असे जरा निराळी......२
तिची अदा करी फिदा ही मेनका कुणी जणु निघाली.......२
तिची अदा करी फिदा ही मेनका कुणी जणु निघाली.......२
raja lalkari ashi ghe-Are Sansar Sansar
राजा ललकारी अशी घे
हाक दिली साद मला दे
कुंकवाचा माझा धनी, बळ वाघाचं आलंया
भरलेल्या मोटंवानी, मन भरून गेलंया
ओढ फुलाला वार्याची, जशी खूण इशार्याची
माझ्या सजनाला कळू दे
सूर भेटला सूराला, गानं आलं तालावर
खुळ्या आनंदाचं माझ्या, हासू तुझ्या गालावर
भरजरीचा हिरवा, शेला पांघरून नवा
शिवार हे सारं खुलू दे
थेंब नव्हं हे घामाचं, त्याचं बनतील मोती
घास देईल सुखाचा, लई मायाळू ही माती
न्याहारीच्या वखुताला, घडीभर इसाव्याला
सावली ही संग मिळू दे
हाक दिली साद मला दे
कुंकवाचा माझा धनी, बळ वाघाचं आलंया
भरलेल्या मोटंवानी, मन भरून गेलंया
ओढ फुलाला वार्याची, जशी खूण इशार्याची
माझ्या सजनाला कळू दे
सूर भेटला सूराला, गानं आलं तालावर
खुळ्या आनंदाचं माझ्या, हासू तुझ्या गालावर
भरजरीचा हिरवा, शेला पांघरून नवा
शिवार हे सारं खुलू दे
थेंब नव्हं हे घामाचं, त्याचं बनतील मोती
घास देईल सुखाचा, लई मायाळू ही माती
न्याहारीच्या वखुताला, घडीभर इसाव्याला
सावली ही संग मिळू दे
Aala Aala Wara - Nisarga Raja - Marathi Song
आला आला वारा …संगे पावसाच्या धारा....... २
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा........ २
आला आला वारा …
नव्या नवतीचं बाई लकाकतं रूप.....२
माखलं ग ऊन जणू हळदीचा लेप...... २
ओठी हसू पापणींत..... आसवांचा झरा
आला आला वारा …संगे पावसाच्या धारा....... २
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा........ २
आला आला वारा …
आजवरी यांना किती जपलं जपलं......२
काळजाचं पानी किती शिपलं शिपलं........२
चेतवून प्राण यांना दिला ग उबारा
आला आला वारा …संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा
आला आला वारा …
येगळी माती आता ग येगळी दुनिया......२
आभाळाची माया बाई करील किमया
फुलंल बाई पावसानं मुलुख ग सारा
आला आला वारा …संगे पावसाच्या धारा......२
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा.......२
आला आला वारा …
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा........ २
आला आला वारा …
नव्या नवतीचं बाई लकाकतं रूप.....२
माखलं ग ऊन जणू हळदीचा लेप...... २
ओठी हसू पापणींत..... आसवांचा झरा
आला आला वारा …संगे पावसाच्या धारा....... २
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा........ २
आला आला वारा …
आजवरी यांना किती जपलं जपलं......२
काळजाचं पानी किती शिपलं शिपलं........२
चेतवून प्राण यांना दिला ग उबारा
आला आला वारा …संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा
आला आला वारा …
येगळी माती आता ग येगळी दुनिया......२
आभाळाची माया बाई करील किमया
फुलंल बाई पावसानं मुलुख ग सारा
आला आला वारा …संगे पावसाच्या धारा......२
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा.......२
आला आला वारा …
Tuesday, May 20, 2014
Yaraa Yaraa'-Duniyadari (2013)Full Video Marathi Song
यारा यारा यारा friendship चा खेळ सारा
यारा यारा यारा friendship चा खेळ सारा - २
येडे चाले कधी उनाड मस्ती , जरी जागरण तरी न सुस्ती ,
यारी ok मग सरि बरसती , फुलतील मग friendship च्या बागा .
भले असे खिशास खिडकी , तरी कधी कुणा लागे न कडकी
यार असो चोर या गोरी लगदिम दिल आता हक्काची जागा .
कसे जगतात न करता यारी , घरदार प्यार यारी सारी ,
मस्त आधार मिले मनाला , दुनियेची या फिकर कुणाला .
प्रेमाचे ऋतु बहरती , स्वप्नाच्या काळ्या उमलती
जगण्याचा सूर उमगतील , छेडून घे हृदयाच्या तारा .
य़ाअराआआह
येडे चाले कधी उनाड मस्ती , जरी जागरण तरी न सुस्ती ,
यारी ok मग सरी बरसती , फुलतील मग friendship च्या बागा .
भले असे खिशास खिडकी , तरी कधी कुणा लागे न कडकी
यार असो चोर या गोरी लगदिम दिल आता हक्काची जागा .
Usavale Dhaage Full Song - Mangalashtk Once More (HD) by Mangesh Borgaonker and Kirti Killedar
उसवले धागे कसे कधी सैल झाली गाठ
पावलांना ही कळेना का हरवली वाट
का किनारे फितूर झाले वादळाला ऐनवेळी
कोणत्याही चाहुलीवीण का अशी स्वप्ने बुडाली
मागण्या आधार उरला एक ही ना काठ
पावलांना ही कळेना का हरवली वाट
उसवले धागे कसे कधी
सावली म्हटली तरीही भावना असती तिला
सोबतीची आस वेडी का अजून लागे मला
गुंतणे माझे सरेना तू फिरवली पाठ
पावलांना ही कळेना का हरवली वाट
उसवले धागे कसे कधी
वाटते आता हवे ते तुझे गंधाळणे
पोळलेल्या या जीवा दे जरासे चांदणे
सोसवेना चालणे हे एकटे उन्हात
पावलांना ही कळेना का हरवली वाट
उसवले धागे कसे कधी....२
Monday, May 19, 2014
Hi Yuga Yuganchi Nati - A very soft, melodious and romantic Marathi song..sung by Suresh Wadkar
ही युगायुगांची नाती, हळव्या प्रेमाची महती
सागर ही थांबे तेव्हा त्या एका थेंबासाठी
अधिऱ्या लहरी तालावरी नाचती
मेघांच्याही मनी कसे सातरंग हासती
वारा हळवा झुळूझुळू वाहतो
मोहरून पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहतो
लाटा सागराला साद देती
रुपेरी वाळूवरी सोनियाचा बंगला
बांधताना प्रीतीमध्ये जीव माझा गुंतला
सागरी तळाशी एक वेडा शिंपला
घरकुल मोतियांनी सजवाया थांबला
दे ना प्रेमधारा तूच स्वाती
Prem Ki Yatana - Time Pass - Sad Song - Latest Marathi Movie - Ketaki, Prathamesh
कधी वाटे मन का हरवते आसू लपवून का मिरवते हे प्रेम की यातना नवे नाते रोज गोड भेटी आता सजा नाव येता ओठी हे प्रेम की यातना आजुबाजू मोठी कुंपणे, नको मरणाला जुंपणे हे प्रेम की यातना पाखरू हृदयातले मनमानी करी बहर ते कोमेजले, वणवा का उरी मनास वाटले, डोळ्यात साठले आभाळ फाटले का अंतरी आठवती सारे राग रुसवे नाही खरे काही भास फसवे हे प्रेम की यातना
कधी वाटे मन का हरवते
आसू लपवून का मिरवते
हे प्रेम की यातना
नवे नाते रोज गोड भेटी
आता सजा नाव येता ओठी
हे प्रेम की यातना
आजुबाजू मोठी कुंपणे, नको मरणाला जुंपणे
हे प्रेम की यातना
Tuzya priticha vinchu -Fandry Song - Ajay Atul
तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला…
जीव झाला येडा-पिसा, रात-रात जागणं…
पुरं दिस-भर, तुझ्या फिरतो मागं-मागणं…
पुरं दिस-भर, तुझ्या फिरतो मागं-मागणं…
जीव झाला येडा-पिसा, रात-रात जागणं…
पुरं दिस-भर, तुझ्या फिरतो मागं-मागणं…
जादू मंतरली कुणी, सपनात जागपनी,
नशिबी भोग असा दावला…
पुरं दिस-भर, तुझ्या फिरतो मागं-मागणं…
जादू मंतरली कुणी, सपनात जागपनी,
नशिबी भोग असा दावला…
तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला…
तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला…
मागं पळून पळून, वाट माझी लागली,
अनं तू वळून बी माझ्याकडे पाहीना…
तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला…
मागं पळून पळून, वाट माझी लागली,
अनं तू वळून बी माझ्याकडे पाहीना…
भिर भिर मनाला ह्या घालू कसा बांध गं…
अवसेची रात मी, अनं पुनवंचा तू चांद गं…
नजरेत मावतीया, तरी दूर धावतीया…
मनीचा ठाव तुझ्या मिळणा…
आता थोरा-मोरं घास तरी गीळणां…
देवा जळून-जळून जीव, प्रीत जुळणां हं…
सारी इस्कटून जिंदगी मी पाहिली,
तरी झाली कुठं चूक मला कळणां…
सांभी कोप-यात उभा एकाला कधीचा,
लाज ना कशाची, तक्रार नाही…
भास वाटतोया, हे खर का सपान,
सुखाच्या ह्या सपनाला थार नाही…
हे रात झाली जगण्याची हाय तरी जिता,
होय प्रेम माझं, अन भाबडी कथा…
बघ, जगतूया कसं, साऱ्या जन्माचं हसं,
जीव चिमटीत असा गावला…
तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला…
तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला…
मागं पळून पळून, वाट माझी लागली,
अनं तू वळून बी माझ्याकडे पाहीना…
Saturday, May 10, 2014
Lovely Marathi Song, from Sanai Chaughade, Kande Pohe
भिजलेल्या क्षणांना आठवणीची फोडणी,
हळदीसाठी आसूसलेले हळवे मन आणि कांती
आयुष्य हे चुलीवरल्या, कढईतले, कांदेपोहे
नात्यांच्या ह्या बाजारातून विक्रेत्यांची दाटी,
आणि म्हणे तो वरचा ठरवी शतजन्माच्या गाठी,
रोज नटवे रोज सजावे धरून आशा खोटी,
पाने मिटुनी लाजळूपरी पुन्हा उघडण्यासाठी,
आयुष्य हे चुलीवरल्या , कढईतले , कांदेपोहे
दूरदेशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहतांना,
कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानीमनी नसतांना,
नकळत आपण हरवून जावे स्वतःस मग जपतांना
अन मग डोळे उघडावे हे दिवा स्वप्न पाहतांना
आयुष्य हे चुलीवरल्या , कढईतले , कांदेपोहे
भूतकाळच्या धूऊन अक्षदा तांदूळ केले ज्यांनी ,
आणि सजवला खोटा रुखवत भाड्याच्या भांड्यांनी ,
भविष्य आता रंगवण्याचा अत्तहासहि यांचास
हातावरल्या मेहेदीवर ओतून लिंबाचे पाणी
आयुष्य हे चुलीवरल्या ,कढईतले ले, कांदेपोहे
हळदीसाठी आसूसलेले हळवे मन आणि कांती
आयुष्य हे चुलीवरल्या, कढईतले, कांदेपोहे
नात्यांच्या ह्या बाजारातून विक्रेत्यांची दाटी,
आणि म्हणे तो वरचा ठरवी शतजन्माच्या गाठी,
रोज नटवे रोज सजावे धरून आशा खोटी,
पाने मिटुनी लाजळूपरी पुन्हा उघडण्यासाठी,
आयुष्य हे चुलीवरल्या , कढईतले , कांदेपोहे
दूरदेशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहतांना,
कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानीमनी नसतांना,
नकळत आपण हरवून जावे स्वतःस मग जपतांना
अन मग डोळे उघडावे हे दिवा स्वप्न पाहतांना
आयुष्य हे चुलीवरल्या , कढईतले , कांदेपोहे
भूतकाळच्या धूऊन अक्षदा तांदूळ केले ज्यांनी ,
आणि सजवला खोटा रुखवत भाड्याच्या भांड्यांनी ,
भविष्य आता रंगवण्याचा अत्तहासहि यांचास
हातावरल्या मेहेदीवर ओतून लिंबाचे पाणी
आयुष्य हे चुलीवरल्या ,कढईतले ले, कांदेपोहे
Olya Sanj Veli - Premachi Goshta - Marathi Song
ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिल्गावी
तशी तू जवळी ये जरा
कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना
आभाळ खाली झुके , पावलांखाली धुके
सुख हे नवे सलगी करे , का सांग ना
सारे जुने दुवे , जळती जसे दिवे
पाण्यावरी जरा सोडून देऊया
माझी हि आर्जवे, पसरून काजवे
जातील या नव्या वाटेवरी तुझ्या
रस्ता नवा शोधू जरा, हातात हात दे
पुसुया जुन्या पाऊल खुणा
सोबत तुझी साथ दे
वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंझाल तुझी पुन्हा वाहून जाऊ दे
डोळ्यातल्या सारी विसरून ये घरी
ओळख आता खरी होऊन जाऊ दे
सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी देईन साथ हि तुला.
Olya Sanjveli, unhe savalis bilgaavi
Tashi tu javali ye jara
Korya kagadachi, kavit aann jashi vhavi
Tashi tu halke bol na
Aabhal khaali jhuke, pavalankhaali dhuke
Sukh he nave salagi kare, ka saang na
Saare june duve, julati jase dive
Panyavari jari sodun deuya
Majhi hi aarjave, pasarun kajave
Jaatil yaa navya vatevari tujhya
Rasta nava shodhu jara, haataat haat de
Pusuya junya paul khuna
Sobat tujhi saath de
Valnavari tujhya paus mi ubha
Onjhal tujhi punha vahun jau de
Dolyatalya sari visarun ye ghari
Olakh aata khari houn jau de
Saambhal tu majhe mala majhya navya phula
Mi savalee houn tujhi dein saath hi tula.
Tashi tu javali ye jara
Korya kagadachi, kavit aann jashi vhavi
Tashi tu halke bol na
Aabhal khaali jhuke, pavalankhaali dhuke
Sukh he nave salagi kare, ka saang na
Saare june duve, julati jase dive
Panyavari jari sodun deuya
Majhi hi aarjave, pasarun kajave
Jaatil yaa navya vatevari tujhya
Rasta nava shodhu jara, haataat haat de
Pusuya junya paul khuna
Sobat tujhi saath de
Valnavari tujhya paus mi ubha
Onjhal tujhi punha vahun jau de
Dolyatalya sari visarun ye ghari
Olakh aata khari houn jau de
Saambhal tu majhe mala majhya navya phula
Mi savalee houn tujhi dein saath hi tula.
Bhijun Gela Wara | Superhit Marathi Romantic Song | Official Full Song
भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा
बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला
ये ना जरा, तू ये ना जरा, चाहूल हलके दे ना जरा
झिम्माड पाऊस, तू नको जाऊस, चुकार ओठ हे बोले
श्वासांत थरथर, सरीवरी सर, मन हे आतूर झाले
ये ना जरा, तू ये ना जरा, मिठीत हलके घे ना जरा
स्पर्शात वारे, निळे पिसारे, आभाळ वाहून गेले
तुझ्यात मी अन माझ्यात तू, कसे दोघांत जग हे न्हाले
ये ना जरा, तू ये ना जरा, मिटून डोळे घे ना जरा
Thursday, May 8, 2014
Gorya Gorya Galavari ,marathi song,Movie tujhya majhya sansarala aani kaai hava music ajay atul kalakaar trupti bhoir,upendra limaye
गोर्या गोर्या गालांवरी चढली लाजंची लाली ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली
सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं
सजली नटली नवरी आली
गोर्या गोर्या गालांवरी चढली लाजंची लाली ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली
नवर्या मुलाची आली हळद ही ओली
हळद ही ओली लावा नवरीच्या गाली
हळदीनं नवरीचं अंग माखवा
पिवळी करून तिला सासरी पाठवा
सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
सासरच्या ओढीनं ही हासते हळूच गाली ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली
आला नवरदेव वेशीला, वेशीला ग, देव नारायण आला ग
मंडपात गणगोत सारं बैसलं ग म्होरं ढोलताशा वाजि रं
सासरी मिळू दे तुला माहेराची माया
माहेराच्या मायेसंगं सुखाची ग छाया
भरुनीया आलं डोळं जड जीव झाला
जड जीव झाला लेक जाय सासरा
किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं
सजली नटली नवरी आली
आनंदाच्या सरी तुझ्या बरसु दे घरीदारी... ग पोरी सुखाच्या सरी...
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली
सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं
सजली नटली नवरी आली
गोर्या गोर्या गालांवरी चढली लाजंची लाली ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली
नवर्या मुलाची आली हळद ही ओली
हळद ही ओली लावा नवरीच्या गाली
हळदीनं नवरीचं अंग माखवा
पिवळी करून तिला सासरी पाठवा
सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
सासरच्या ओढीनं ही हासते हळूच गाली ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली
आला नवरदेव वेशीला, वेशीला ग, देव नारायण आला ग
मंडपात गणगोत सारं बैसलं ग म्होरं ढोलताशा वाजि रं
सासरी मिळू दे तुला माहेराची माया
माहेराच्या मायेसंगं सुखाची ग छाया
भरुनीया आलं डोळं जड जीव झाला
जड जीव झाला लेक जाय सासरा
किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं
सजली नटली नवरी आली
आनंदाच्या सरी तुझ्या बरसु दे घरीदारी... ग पोरी सुखाच्या सरी...
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली
Saazni (Official Video),marathi song, Composed and sung by Shekhar Ravjiani
साजणी, नभात नभ दाटून आले कावरे मन हे झाले, तू ये ना साजणी सळसळतो वारा, गार गार हा शहारा लाही लाही धरतीला, चिंब चिंब दे किनारा तुझ्या चाहुलीनं ओठी येती गाणे साजणी, छळतो मज हा मृद्गंध तुझ्या स्पर्शासम धुंद, तू ये ना साजणी रिमझिम रिमझिम या नादान पायी, शिवार झालं बेभान सये भिजूया रानात मनात पानात हसू दे सोन्याचं पाणी हुरहूर लागी जीवा नको धाडू गं सांगावा ये ना आता बरसत ये ना गुणगुणते ही माती, लवलवते ही पाती सर बरसे सयींची रुजवाया नवी नाती तुझ्या चाहुलीनं ओठी येती गाणी
Tujhya Vina ,marathi song - Eka Lagnachi Dusri Goshta
तुझ्याविना ,तुझ्याविनातुझ्याविना ,तुझ्याविना
भास का हा तुझा होत असे मला ... सांग ना
लागते ओढ का सारखी अशी ... सांग ना
झालो अनोळखी माझा मलाच मी
वाटे मला का व्यर्थ सारे ... सांग ना
तुझ्याविना ,तुझ्याविना
भास का हा तुझा होत असे मला ... सांग ना
लागते ओढ का सारखी अशी ... सांग ना
झाले अनोळखी माझी मलाच मी
वाटे मला का व्यर्थ सारे ... सांग ना
तुझ्याविना ,तुझ्याविना
उमजून सारे जरी खेळ हा मांडला
तरीही कसा सांग ना जीव हा गुंतला
झाले आता जरी होते जसे मनी
का हे बदलले अर्थ सारे ... सांग ना
तुझ्याविना ,तुझ्याविना
वाट होते माझी तुझी जरी वेगळी
सोबतीची तरी आस सांग का लागली
फिरुनी पुन्हा नवे नाते मला हवे
जीव तुटतो का हा असा रे ... सांग ना
Marathi Movie Duniyadari Song Tik Tik Vajate Dokyat Sonu Nigam,
टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात
कभी जमीन कधी नभी, संपते अंतर झोक्यात
नाही जरी सरी तरी भिजते अंग पाण्याने
सोचो तुम्हें पलभर भी बरसे सावन जोमाने
शिंपल्यांचे शो-पीस नको
जीव अडकला मोत्यात
टिक टिक …
सूर ही तू, ताल ही तू
रुठे जो चांद वो नूर है तू
आसु ही तू हसू ही तू
ओढ मनाची नि हूरहुर तू
रोज नवे भास तुझे, वाढते अंतर श्वासात
टिक टिक …
Wednesday, May 7, 2014
Vitthala - Zenda marathi movie song
जगन्याच्या वारीत मिळे ना वाट, साचले मोहाचे धुके घनदाट
आपली माणसं, आपलीच नाती.. तरी कळपाची मेंढरास भीती
विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती ?
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता
पुरे झाली आता उगा माथेफोडी, दगडात माझा जीव होता
उजळावा दिवा म्हणुनीया किती मुक्या बिचार्या जळति वाती
वैरी कोण आहे इथे कोण साथी, विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती ?
बुजगावण्यागत व्यर्थ हे जगनं, उभ्याउभ्या संपून जाई
खळं रितंरितं माझं बघुनी उमगलं, कुंपन हिथं शेत खाई
भक्ताच्या कपाळी सारखीच माती तरी, झेंडे येगळे.. येगळ्या जाती
सत्तेचीच भक्ती सत्तेचीच प्रीती, विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती ?
Shodhisi Manava Rauli Mandiri Marathi song
शोधिसी मानवा राऊळी, मंदिरी
नांदतो देव हा आपुल्या अंतरी
मेघ हे दाटती कोठुनी अंबरी ?
सूर येती कसे वाजते बासरी ?
रोमरोमी फुले तीर्थ हे भूवरी
दूर इंद्रायणी, दूर ती पंढरी
गंध का हासतो पाकळी सारुनी ?
वाहते निर्झरी प्रेमसंजीवनी
भोवताली तुला साद घाली कुणी
खूण घे जाणुनी रूप हे ईश्वरी
भेटतो देव का पूजनी अर्चनी ?
पुण्य का लाभते दानधर्मातुनी ?
शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी
आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी ?
Hi Gulabi Hawa -Marathi song- Movie Golmaal
ही गुलाबी हवा वेड लावी जिवा
हाय् श्वासांतही ऐकु ये मारवा
तार छेडी कुणी रोमरोमांतुनी
गीत झंकारले आज माझ्या मनी
सांजवार्यातही गंध दाटे नवा
का कुणी रंग हे उधळले अंबरी
भान हरपून मी कावरी, बावरी
का कळेना तरी बोलतो पारवा
Kalat Nakalat ghadate- Serial (zee Marathi)- marathi song
मन होई फुलांचे थवे गंध हे नवे कुठुनसे येती
मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली हुळहुळणारी माती
मन वार्यावरती झुलते, असे उंच उंच का उडते
मग कोणा पाहून भुलते-
सारे कळत नकळतच घडते
कुणितरी मग माझे होईल हात घेउनी हाती
मिठीत घेऊन मोजू चांदण्या काळोखाच्या राती
उधळून द्यावे संचित सारे आजवरी जे जपले
साथ राहू दे जन्मोजन्मी असेच नाते अपुले
पण कसे कळावे कुणी सांगावे आज-उद्या जे घडते
जरी हवे वाटते नवे विश्व ते पाऊल का अडखळते
वाहत-वाहत जाताना मन क्षितिजापाशी अडते
परि पुन्हापुन्हा मोहरते-
सारे कळत नकळतच घडते
Varya Varti Gandh Pasarla marathi song
वार्यावरती गंध पसरला नाते मनाचे
मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे
जल्लोष आहे आता उधाणलेला
स्वर धुंद झाला मनी छेडलेला
शहारलेल्या, उधाणलेल्या कसे सावरावे !
स्वप्नातले गाव माझ्यापुढे
दिवसाचा पक्षी अलगद उडे
फांदिच्या अंगावरती
चिमणी ती चिवचिवणारी
झाडात लपले सगे-सोयरे
हा गाव माझा जुना आठवांचा
नादात हसर्या या वाहत्या नदीचा
ढगात उरले पाऊसगाणे कसे साठवावे !
हातातले हात मन बावरे
खडकाची माया कशी पाझरे
भेटीच्या ओढीसाठी श्वासांचे झुंबर हलते
शब्दांना कळले हे गाणे नवे
ही वेळ आहे मला गोंदणारी
ही धुंद नाती गंधावणारी
पुन्हा एकदा उरी भेटता कसे आवरावे ?
Abhas Ha Marathi song movie Yanda kartavya aahe
कधी दूर दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का
का हे कसे, होते असे, ही आस लागे जिवा
कसा सावरू मी, आवरू ग मी स्वत:
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला !
क्षणात सारे उधाण वारे, झुळुक होऊन जाती
कधी दूर तूही, जवळ वाटे पण, काहीच नाही हाती
मी अशीच हासते, उगीच लाजते, पुन्हा तुला आठवते
मग मिटून डोळे तुला बाहते तुझ्याचसाठी सजते
तू नसताना असल्याचा खेळ हा
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला !
मनात माझ्या हजार शंका, तुला मी जाणू कसा रे
तू असाच आहेस, तसाच नाहीस, आहेस खरा कसा रे
तू इथेच बस न, हळूच हस न, अशीच हवी मला तू
पण माहीत नाही मलाही अजुनी तशीच आहेस का तू
नवे रंग सारे नवी वाटे ही हवा
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला !
का हे कसे, होते असे, ही आस लागे जिवा
कसा सावरू मी, आवरू ग मी स्वत:
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला !
क्षणात सारे उधाण वारे, झुळुक होऊन जाती
कधी दूर तूही, जवळ वाटे पण, काहीच नाही हाती
मी अशीच हासते, उगीच लाजते, पुन्हा तुला आठवते
मग मिटून डोळे तुला बाहते तुझ्याचसाठी सजते
तू नसताना असल्याचा खेळ हा
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला !
मनात माझ्या हजार शंका, तुला मी जाणू कसा रे
तू असाच आहेस, तसाच नाहीस, आहेस खरा कसा रे
तू इथेच बस न, हळूच हस न, अशीच हवी मला तू
पण माहीत नाही मलाही अजुनी तशीच आहेस का तू
नवे रंग सारे नवी वाटे ही हवा
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला !
Tu Niragas Chandrama Marathi song movie Manini.
तू निरागस चंद्रमा, तू सखी मधुशर्वरी
चांदणे माझ्या मनीचे पसरले क्षितिजावरी
काजळाचे बोट घे तू लावुनी गालावरी
मन्मनीचे भाव सारे उमलले चेहर्यावरी
पाहतो जेव्हा तुला मी गझल उमटे अंतरी
शब्द झाले सप्तरंगी झेप घेण्या अंबरी
सागराशी भेटण्या आतुर झाला हा रवी
भोवतीचे तेज सारे वाटते दुनिया नवी
हासता तू सूर ही झंकारले वार्यावरी
मी न माझी राहिले ही नशा जादुभरी
चांदणे माझ्या मनीचे पसरले क्षितिजावरी
काजळाचे बोट घे तू लावुनी गालावरी
मन्मनीचे भाव सारे उमलले चेहर्यावरी
पाहतो जेव्हा तुला मी गझल उमटे अंतरी
शब्द झाले सप्तरंगी झेप घेण्या अंबरी
सागराशी भेटण्या आतुर झाला हा रवी
भोवतीचे तेज सारे वाटते दुनिया नवी
हासता तू सूर ही झंकारले वार्यावरी
मी न माझी राहिले ही नशा जादुभरी
Mala Sanga sukha Mhanje Nakki Kai Asat akka lagnachi gotht,marathi song
मला सांगा सूख म्हणजे नक्की काय असतं ?
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं !
दान घेतानाही झोळी हवी रिकामी
भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली
आपण फक्त घेताना लाजायचं नसतं
देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो
हवंय ? नको ! ते म्हणणं प्रश्नच नसतो
आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं
Tuesday, May 6, 2014
Man Udhan Varyache ..movie : Agga Bai Arrecha Music Composed by : Ajay Atul Directed by : Kedar Shinde Singer : Shankar Mahadevan.
मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते,
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वार्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !
आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते,
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते
सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते ?
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन् क्षणात फिरुनी आभाळाला भिडते !
मन उधाण वार्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !
रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते,
कधी गहिर्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते ?
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते !
जाणते जरी हे पुन्हापुन्हा का चुकते ?
भाबडे तरी भासांच्या मागून पळते !
मन उधाण वार्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !
Deva Tujhya Gabharyala Duniyadari marathi song
देवा तुझ्या गाभार्याला.. उंबराच न्हाई
सांग कुठं ठेवू माथा ?.. कळंनाच काही
देवा कुठं शोधू तुला ?.. मला सांग ना..
प्रेम केलं एवढाच.. माझा रे गुन्हा !
देवा काळजाची हाक.. ऐक एकदा तरी..
माझ्या ह्या जिवाची आग.. लागुदे तुझ्या उरी..
आरपार काळजात का दिलास घाव तू ?
दगडाच्या काळजाचा.. दगडाचा देव तू..
का ? कधी ? कुठे?.. स्वप्न विरले.. प्रेम हरले..
स्वप्न माझे.. आज नव्याने.. खुलले..
अर्थ सारे स्पर्शांने उलगडले..
आरपार काळजात का दिलास घाव तू ?
दगडाच्या काळजाचा.. दगडाचा देव तू..
देवा काळजाची हाक.. ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जिवाची आग.. लागुदे तुझ्या उरी
का रे ?.. तडफड ही.. ह्या काळजामधी..
घुसमट तुझी रे.. होते का कधी ?
मानसाचा तू.. जल्म घे..
डाव जो मांडला.. मोडू दे..
का हात सुटले ?.. श्वास मिटले.. ठेच लागे..
उत्तरांना प्रश्न कसे हे पडले..
अंतरांचे अंतर कसे ना कळले..
देवा काळजाची हाक.. ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जिवाची आग.. लागुदे तुझ्या उरी
आरपार काळजात का दिलास घाव तू ?
दगडाच्या काळजाचा.. दगडाचा देव तू..
Ushakal Hota Hota Kal Ratra Zhali Asha Bhosale marathi song
उषःकाल होता होता काळरात्र झाली !
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !........ २
आम्ही चार किरणांचीही आस का धरावी ?...... २
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी ?....... २
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !...... २
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !
उषःकाल होता होता काळरात्र झाली !
तिजोर्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,........ २
आम्हावरी संसारची उडे धूळमाती !......... २
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही ना वाली !........ २
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !
उषःकाल होता होता काळरात्र झाली !
उभा देश झाला आता एक बंदिशाला।........२
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला !........ २
कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली !.......... २
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !
उषःकाल होता होता काळरात्र झाली !
धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे !........ २
अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !......... २
आसवेच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली !......... २
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !
उषःकाल होता होता काळरात्र झाली ! अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !
Preeticha Zhul Zhul Pani marathi song
प्रीतिचं झुळझुळ पाणी
वार्याची मंजुळ गाणी
रोमांची सर्वांगी गेले मी न्हाऊनी........२
हा जीव वेडा होई थोडा थोडा
वेड्या मनाचा बेफाम घोडा
दौडत आला सखे तुझा बंदा
चल प्रेमाचा रंगु दे विडा
साजणा मी तुझी कामिनी
प्रीतिचं झुळझुळ पाणी
मी धुंद झाले मनमोर डोले
पिसार्यातून हे खुणावित डोळे
डोळ्यांत जाळे, खुळी मीच झाले
स्वप्नफुलोरा मनात झुले
मी तुझा हंस ग मानिनी
प्रीतिचं झुळझुळ पाणी
Fite Andharache Jale marathi song
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश
दरीखोर्यांतून वाहे एक प्रकाश प्रकाश................ २
रान जागे झाले सारे पायवाटा जाग्या झाल्या......... २
सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य आले भरास भरास
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश
दंव पिऊन नवेली झाली गवताची पाती........... २
गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश
झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख....... २
चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश
दरीखोर्यांतून वाहे एक प्रकाश प्रकाश................ २
Nisarg Raja Aik Sangato marathi song
निसर्गराजा ऐक सांगते गुपित जपलं रे
कुणी माझ्या मनात लपलंय् रे
तो दिसला अन् मी पाहिले -- पाहिले परि ते कुर्रयाने
डोळ्यांत इशारे हसले -- हसले ते मोठ्या तोर्याने
हे कसे न त्याला कळले -- कळले न तुझ्या त्या ओठाने
ओठ न हलले शब्द न जुळले, थोडे चुकले रे
का चाललात ? -- तुम्ही आलात म्हणून
जरा थांबा ना -- का ? -- वा छान दिसतंय् ! -- काय ?
हे रूप भिजलेलं -- आणि ते पहा -- काय ?
अन् तुमचं मनही भिजलेलं -- कशानं ?
प्रेमानं प्रेमानं प्रेमानं
निसर्गराजा ऐक सांगतो गुपित जपलं रे
कुणी माझ्या मनात लपलंय् रे
तो भाव प्रीतिचा दिसला -- दिसला मग संशय कसला ?
हा नखरा का मग असला ? -- असला हा अल्लड चाळा
प्रेमात बहाणा कसला ? -- कसला तो प्रियकर भोळा !
प्रीत अशी तर रीत अशी का, कोडं पडलंय रे
कुणी माझ्या मनात लपलंय् रे
निसर्गराजा ऐक सांगतो
कुणी माझ्या मनात लपलंय् रे
तो दिसला अन् मी पाहिले -- पाहिले परि ते कुर्रयाने
डोळ्यांत इशारे हसले -- हसले ते मोठ्या तोर्याने
हे कसे न त्याला कळले -- कळले न तुझ्या त्या ओठाने
ओठ न हलले शब्द न जुळले, थोडे चुकले रे
का चाललात ? -- तुम्ही आलात म्हणून
जरा थांबा ना -- का ? -- वा छान दिसतंय् ! -- काय ?
हे रूप भिजलेलं -- आणि ते पहा -- काय ?
अन् तुमचं मनही भिजलेलं -- कशानं ?
प्रेमानं प्रेमानं प्रेमानं
निसर्गराजा ऐक सांगतो गुपित जपलं रे
कुणी माझ्या मनात लपलंय् रे
तो भाव प्रीतिचा दिसला -- दिसला मग संशय कसला ?
हा नखरा का मग असला ? -- असला हा अल्लड चाळा
प्रेमात बहाणा कसला ? -- कसला तो प्रियकर भोळा !
प्रीत अशी तर रीत अशी का, कोडं पडलंय रे
कुणी माझ्या मनात लपलंय् रे
निसर्गराजा ऐक सांगतो
JOGWA Lallati Bhandaar marathi song
नदीच्या पल्याड आईचा डोंगुर
डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर...........२
घालु जागर जागर डोंगर माथ्याला.......२
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार
नदीच्या पान्यावर आगीनं फुलतं
तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं.........२
नाद आला ग आला ग जिवाच्या घुंगराला......... २
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार
नवसाला पाव तू, देवी माझ्या हाकंला धाव तू
हाकंला धाव तू, देवी माझ्या अंतरी र्हाव तू.......... २
देवी माझ्या अंतरी र्हाव तू, काम क्रोध परतुनी लाव तू
काम क्रोध परतुनी लाव तू, देवी माझी पार कर नाव तू
डोळा भरून तुझी मुरत पाहीन
मुरत पाहीन, तुझा महिमा गाईन
महिमा गाईन, तुला घुगर्या वाहीन
घुगर्या वाहीन, तुझा भंडारा खाईन
दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला........ २
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार
यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती ही जमल्या ग लेकरं
पुनवंचा चांदवा देवीचा ग मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर, जागर ह्यो, भक्तीचा सागर
खणा-नारळानं वटी मी भरीन
वटी मी भरीन, तुझी सेवा करीन
सेवा करीन, तुझा देवारा धरीन
देवारा धरीन, माझी वंजळ भरीन
आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला......... २
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार
यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती ही जमल्या ग लेकरं
पुनवंचा चांदवा देवीचा ग मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर, जागर ह्यो, भक्तीचा सागर
khel mandala full song of Natarang movie
तुझ्या पायरीशी कुनी सानथोर न्हाई
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
तरी देवा सरं ना ह्यो भोग कशापायी
हरवली वाट दिशा अंधारल्या दाही
ववाळुनी उधळतो जीव मायबापा
वनवा ह्यो उरी पेटला .... खेळ मांडला
सांडली गा रीतभात घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीव गा खेळ मांडला
दावी देवा पैलपार पाठीशी तू र्हा हुबा
ह्यो तुझ्याच उंबर्यात.... खेळ मांडला
उसवलं गनगोत सारं आधार कुनाचा न्हाई
भ्येगाळल्या भुईपरी जीनं अंगार जिवाला जाळी
बळ दे झुंजायाला किरपेची ढाल दे
इनविती पंचप्रान जिव्हारात ताल दे
करपलं रान देवा जळलं शिवार
तरी न्हाई धीर सांडला ... खेळ मांडला
Khel Khunala Daivacha Kalala-marathi song
खेळ कुणाला दैवाचा कळला ?
मी असो, तू असो, हा असो, कुणी असो
दैवलेख ना कधी कुणा टळला !
खेळ कुणाला दैवाचा कळला ?
जवळ असुनही कसा दुरावा ?
भाव मनीचा कुणा कळावा ?........... २
खेळ कुणाला दैवाचा कळला ?.......... २
मी असो, तू असो, हि असो, कुणी असो
दैवलेख ना कधी कुणा टळला !
हार कुणाची ? जीत कुणाची ?
झुंज चालली दोन मनांची........ २
खेळ कुणाला दैवाचा कळला ?....... २
मी असो, तू असो, हा असो, कुणी असो
दैवलेख ना कधी कुणा टळला !
सौभाग्याला मिळे सहारा
मला न माहित कुठे किनारा....... २
खेळ कुणाला दैवाचा कळला ?..... २
मी असो, तू असो, हा असो, कुणी असो
दैवलेख ना कधी कुणा टळला !
खेळ कुणाला दैवाचा कळला ?....... २
Anjanichya Suta Tula Ramach,marathi song
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान..........२
दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
हादरली ही धरणी, थरथरले आसमान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
लक्ष्मणा आली मूर्च्छा लागुनिया बाण
द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण
तळहातावर आला घेऊनी पंचप्राण
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका
तिथे रामनामाचा तू वाजविला डंका
दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला
उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
आले किती, गेले किती, संपले भरारा
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा
धावत ये लवकरी, आम्ही झालो रे हैराण
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
धन्य तुझे रामराज्य, धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा ?
घे बोलावून आता कंठाशी आले प्राण
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान..........२
दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
हादरली ही धरणी, थरथरले आसमान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
लक्ष्मणा आली मूर्च्छा लागुनिया बाण
द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण
तळहातावर आला घेऊनी पंचप्राण
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका
तिथे रामनामाचा तू वाजविला डंका
दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला
उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
आले किती, गेले किती, संपले भरारा
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा
धावत ये लवकरी, आम्ही झालो रे हैराण
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
धन्य तुझे रामराज्य, धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा ?
घे बोलावून आता कंठाशी आले प्राण
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
Monday, May 5, 2014
Ek Dhaga Sukhacha-marathi song
एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे
जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे.......... २
पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा, जासी उघडा........ २
कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे...........२
एक धागा सुखाचा…
मुकी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची........ २
जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे !......... २
एक धागा सुखाचा.....
या वस्त्राते विणतो कोण ? एक सारखी नसती दोन....... २
कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्याचे !...... २
Ugavali Shrukrachi Chandani-De dhakka-Marathi song
अडवू नका मज... सोडा आता, पुरं झालं ना.. धनी
उगवली….
उगवली शुक्राची चांदणी !.......४
अडवू नका मज... सोडा आता, पुरं झालं ना.. धनी
उगवली शुक्राची चांदणी !.......४
( हिचं ऐका पाव्हणं, काय हे वागणं शोभतंय् व्हय् तुम्हाला ?
हिचा हात धरून, गालामध्ये हसणं शोभतंय् का तुम्हाला ?
जरा लाज धरा हो येता-जाता पाहिल् ना हो कुणी ! )
उगवली शुक्राची चांदणी !......४
निरव शांतता अवतीभवती, रातकिडं हे किरकिर करती......२
भिरभिर उडती वर पाकोळ्या धडधड होते मनी
उगवली....
उगवली शुक्राची चांदणी !……४
लवलव करिती हिरवी पाती, चमचमणार्या चांदणराती…… २
वार्यावरती गंध दरवळे केतकीच्या या बनी
उगवली......
उगवली शुक्राची चांदणी !........४
(हिचं ऐका पाव्हणं, काय हे वागणं शोभतंय् व्हय् तुम्हाला ?
हिचा हात धरून, गालामध्ये हसणं शोभतंय् का तुम्हाला ?
जरा लाज धरा हो येता-जाता पाहिल् ना हो कुणी ! )
उगवली शुक्राची चांदणी !........४
Aai Bhavani Tujhya Krupene-Marathi Song
आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला.................२
अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला.................२
आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी......... २
आज गोंधळाला ये ....
गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये...........}
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये............} २
उधं उधं उधं उधं उधं
गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ
हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संबळ
धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्मा भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता
आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी……..२
आज गोंधळाला ये ....
गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये...........}
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये............} २
उधं उधं उधं उधं उधं
अग सौख्यभरीला माणिकमोती मंडप आकाशाचा
हात जोडुनि करुणा भाकितो उद्धार कर नावाचा
अधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिला
महिषासुर-मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला
आज आम्हांवरी संकट भारी धावत ये लौकरी………..२
अंबे गोंधळाला ये
गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये……..}
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळला ये……....} २
अंबाबाईचा ..... उधं उधं उधं उधं उधं
बोल भवानी मातेचा ..... उधं उधं उधं उधं उधं
सप्तशृंगी मातेचा ..... उधं उधं उधं उधं उधं
Radhe Krishanna Namm- Swapnil Bandodkar-Marathi Song
वृन्दावनी सा रंग हा, का लावी घोर जिवाला... झाली अशी वेडी पिशी, कोणी जाउन सांगा त्याला.. (२)
हा मंद गंध भवताली, राधेला वाट गवसली (२)
कधी झर झर पाण्यातुन सुर सुर येती,
कानी स स स प प प म म प ध प म ग रे म प,
राधे कृष्ण राधे कृष्ण नाम, घे गौळण राधा..
राधे कृष्ण राधे कृष्ण नाम, घे गौळण राधा..
राधे कृष्ण राधे कृष्ण नाम............. 11ध11
डोई वरती घागर घेउनी, जाई राधा नदी किनारी.. हळुच कुठुनसा येई मुरारी, बावरलेली होई बिचारी..
शब्द शब्द अवघडले, परी नजरेतूनच कळले (२)
आज ऐकण्यादी कान होई अधीर अधीर,
मन स स स प प प म म प ध प म ग रे म प,
राधे कृष्ण राधे कृष्ण नाम, घे गौळण राधा..
राधे कृष्ण राधे कृष्ण नाम, घे गौळण राधा..राधे कृष्ण राधे कृष्ण नाम...............11१11
गोड गोजिरी, मूर्त सावळी, प्रिती ची तव रीत आगळी.. म्हणती सारे आज गोकुळी, राधा माधव नाही वेगळे मनी चांदणे फुलती, पाहुनिया फुले नाते (२)
कधी येणार येणार श्याम रोखुनिया डोळे,
प्राण स स स प प प म म प ध प म ग रे म प,
राधे कृष्ण राधे कृष्ण नाम, घे गौळण राधा...
राधे कृष्ण राधे कृष्ण नाम, घे गौळण राधा... राधे कृष्ण राधे कृष्ण नाम...............11२11
वृन्दावनी सा रंग हा, का लावी घोर जिवाला झाली अशी वेडी पिशी, कोणी जाउन सांगा त्याला.. (२)
हा मंद गंध भवताली, राधेला वाट गवसली (२)
कधी झर झर पाण्यातुन सुर सुर येती,
कानी स स स प प प म म प ध प म ग रे म प,
राधे कृष्ण राधे कृष्ण नाम, घे गौळण राधा...
राधे कृष्ण राधे कृष्ण नाम, घे गौळण राधा... राधे कृष्ण राधे कृष्ण नाम..............
राधे कृष्ण राधे कृष्ण नाम.............
Ekach Ya Janmi Janu-Marathi Song
एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी......२
फिरुनी नवी जन्मेन मी......
स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील सार्या लयाला प्रथा
भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी ना व्यथा
ना बंधने नाही गुलामी, भीती अनामी विसरेन मी
हरवेन मी, हरपेन मी.…….२
तरीही मला लाभेन मी
एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी......२
फिरुनी नवी जन्मेन मी......२ 11१11
आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या, फुलतील कोमेजल्या वाचुनी
माझ्या मनीचे गूज घ्या जाणूनी, या वाहणार्या गाण्यातूनी
आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या, फुलतील कोमेजल्या वाचुनी
माझ्या मनीचे गूज घ्या जाणूनी, या वाहणार्या गाण्यातूनी
लहरेन मी, बहरेन मी.……२
क्षितीजातूनी उगवेन मी
एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी......२
फिरुनी नवी जन्मेन मी......२ 11२11
Subscribe to:
Posts (Atom)